बिरसिंगपूर मध्ये ‘आमचे गाव आमची जवाबदारी’ मोहिम; सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच राजु मुळेंचा पुढ़ाकार

0
131

बिरसिंगपूर मध्ये ‘आमचे गाव आमची जवाबदारी’ मोहिम; सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच राजु मुळेंचा पुढ़ाकार

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) नजीकच्या बिरसिंगपूर येथे कोरोनविरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून नव्याने ‘आमचे गाव आमची जवाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली,
गाव कोरोना मुक्त व्हावे यासाठी सरपंच वैशाली शिंदे व उपसरपंच राजु मुळे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच विविध उपाययोजना केल्या आहे, दुसऱ्यांदा राबविण्यात आलेले ‘आमचे गाव’ हे अभियान याचाच भाग होय, यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने सुसज्ज नियोजन करण्यात आले, यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, एमपीडब्ल्यू आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले, त्यांची 4 पथके करण्यात आली, या पथकांनी घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनर, ऑक्सिमिटर ने गावकऱ्यांचे तापमान, शरीरातील ऑक्सिजन पातळी घेतली, याशिवाय ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या लसीकरणावर भर दिल्याचे राजुदादा मुळे यांनी सांगितले, आजवर 400 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, 45 वर्षावरील 380 जनांचे लसीकरण झाले असून 160 जनांना लवकरच लस देण्याचे नियोजन आहे, पाडली पीएचसी मध्ये लसीकरण साठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here