: *पाणीपुरवठा अभियंत्याला काँग्रेस नगरसेवकाकडून मारहाण* :वॉर्डमध्ये पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून नगरपरिषदेचे अभियंता आणि एका नगरसेवकांमध्ये वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यामध्ये नगरसेवकाने अभियंत्याला जबर मारहाण केल्याची घटना मलकापूर शहरात आज घडली. याप्रकरणी काँग्रेस नागरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेचे सदस्य सनाउल्ला खान यांच्या वॉर्डामध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सदर काम पूर्ण झालेले नसून ह्या कामांचा पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करा अशी मागणी नगरसेवक सनाउल्लाह खान यांची होती. आज न.प. च्या बैठकीत हा विषय चर्चिल्या जात असतांना नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता निनाद आचारी आणि काँग्रेसचे नगरसेवक सनाउल्ला खान यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यानंतर दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर नगरसेवक खान यांनी अभियंता आचारी यांना मारहाण केली . घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मलकापूर शहर पोस्ट गाठून कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी नागरसेवकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे घटनेच्या निषेधार्थ आज नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते.
–