. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारून बुलढाणा जिल्हा परिषदेने केला शिवराज्याभिषेक दिन साजरा*
बुलडाणा : : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त बुलडाणा जिल्हा परिषद कार्यालय येथे आज सहा जून रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारून साजरा करण्यात आला
तांब्याचा कळस भगवी पताका आणि त्यांना आंब्या आंब्याचे तोरण बांधून ही गुढी उभारण्यात आली होती तर गुढीच्या पायथ्याशी आकर्षक अशी पुष्प सजावट आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती सुरुवातीला राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्राम झाला या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार उपाध्यक्ष कमलताई जालींदर बुधवत जिल्हा परिषदेच्या सिईओ भाग्यश्री विसपुते यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते
यावेळी बोलताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे महाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील रयतेचे राज्य ज्या पद्धतीने सुरू होतं त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडीचे काम सुरू आहे कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडण्याचे काम राज्य सरकार करत आहे महाराष्ट्र मध्ये उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे काम केला जात आहे देशात सर्वात पारदर्शक काम कोरोनाच्या काळात राज्य सरकार करत आहे सतत महाराष्ट्रावर कोणतना कोणतं संकट येत आहे अतिवृष्टी आहे वादळ आहे कोरोना सारखी महामारीतून आपली अर्थव्यवस्था सावरत असताना आज आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याच प्रयत्न महाविकासआघाडी करत आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले तसेच बुलडाणा जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयवर सुद्धा गुढी उभारण्यात येऊन हा दिन साजरा केला गेली … …हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखून प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला