*पशुवैद्यकीय कर्मचार्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आंदोलन*
Anchor : – पशुवैद्यकीय कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दोन ऑगस्टला पशुवैद्यकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले
पशुधन पर्यवेक्षकांची पदे गेल्या अठरा वर्षांपासून न भरल्यामुळे अनेक जिल्ह्यात पशुधन पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांकडे 2 ते 17 दवाखान्याचा अतिरिक्त पदभार आहे त्यामुळे कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण पडत असून ही पदे त्वरित भरावीत. राज्यातील पशुधन पर्यवेक्षक ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्या पदोन्नत्या त्वरित कराव्यात . सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गाच्या विभाग निहाय असलेला असमतोल त्वरीत दूर करावा. पशु वैद्यकीय परिषद अधिनियम 1984 च्या कायद्यात बदल करावा. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरावेत. प्रत्येक गावांमध्ये पशु प्रथमोपचार केंद्र स्थापन करावेत. या व अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पशु पदवीधारक पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचकाम केलं या आंदोलनात पशुचिकित्सक व्यवसायिक संघटना .पदवीधारक पशुवैद्यकीय संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर सहभागी झाले होते पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पशु वैद्यकीय सेवा बाधीत झाली आहे तेव्हा शासनाने त्यांच्या मागणीकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संपात दरम्यान जर पशुंचा बळी गेला तर मेलेले जनावरे मंत्रालयामध्ये आणून टाकू असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
*Yuwaraj wagh buldana*