*शेगाव संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन*
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज बुधवार 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास मृत्युसमयी त्यांचे वय 83 वर्षाचा होतं गेल्या तीन महिन्यापासून ते आजारी होते 12 जानेवारी 1938 साले जन्मलेले शिवशंकरभाऊ पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून शेगाव संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून कार्यरत होते अत्यंत साधी राहणी त्यांची होती शेगाव संस्थानच्या विकासामध्ये त्यांच मोलाचं योगदान आहे शिव शंकर भाऊ यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली आणि नातवंडे असा आप्त परिवार आहे
कोरोना नियमामुळे आज सायंकाळी त्पाच्या घराजवळच्या शेतातच अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार कार्यक्रम झाला यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व काही मोजकीच मंडळी अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होती