सुरक्षारक्षकने काढले धक्के मारून बाहेर
बुलढाणा प्रतिनिधी👉
अनुकंपा तत्वावर एसटी महामंडळाच्या सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी चिखली येथील मायलेक मारतात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात चकरा … दाद मागितल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षक द्वारे धक्के मारून बाहेर काढल्याचा मायलेकांनी केलाय आरोप…एसटी महामंडळाच्या चिखली आगारामध्ये चालकम्हणून कार्यरत असलेले शिवानंद गिते यांना डिसेंबर 2018 मध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांच्यावर एक वर्षभर उपचार करण्यात आले आणि त्यातून ते बरे झाले त्यानंतर त्यांना रुजू होण्यासाठी आले असता त्यांना मेडिकल बोर्डकडे पाठवण्यात आले बोर्डाने त्यांना हलके कामासाठी फिट असल्याचा अभिप्राय देखील दिला, मात्र या कर्मचाऱ्याला हलक्या कामावर रुजू करण्याऐवजी त्यांना सेवेतूनच काढून टाकण्यात आल ..नंतर त्याला पर्यायी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सांगण्यात आले, या कर्मचाऱ्याने आरटीओ विभागाकडे आपल्या चालक पदाचे लायसन रद्द करण्यासाठी अर्ज केला, मात्र या कार्यालयाकडून आणि विभाग नियंत्रकाच्या कार्यालयाकडून देखील कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे दरम्यान हावलदिल झालेल्या शिवानंद गिते या एसटी कर्मचाऱ्याचा 2020 मध्ये मृत्यू झाला… आता या कर्मचाऱ्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे पाठपुरावा करून अनुकंपा मध्ये नोकरीसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांना प्रतिसाद देण्याऐवजी उद्धटपणे वागणूक देऊन त्यांना सुरक्षा रक्षकांच्यामार्फत कार्यालयातून धक्के मारून बाहेर काढल्या गेल्याचा मृतक कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलाने केला आहे …..