माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयासमोर डफडे वाजवुन प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न..
बुलडाणा प्रतिनिधी – खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टी चे तत्कालीन सभापती आणि प्रशासकांनी संगणमत करून कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे… याबाबत वेळो-वेळी तक्रारी केल्यानंतर ही कारवाई होत नाही, म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात आज क्रांतिदिनी बुलढाणा येथील उपजिल्हा निबंधक यांच्या कार्यालयासमोर डफडे बाजाव आंदोलन करण्यात आले… अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती..
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती, यावेळी सभापती संतोष ताले आणि सचिव भिसे यांनी आपल्या कार्यकाळात अधिकाराचा गैरवापर करीत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे… कोरोना काळामध्ये 5000 कोरोना किट चे वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपये गडप केलें.. सुरक्षारक्षकांच्या नावानेही अनेक बिले अनधिकृतपणे काढण्यात आलेली आहे, यासंदर्भात शासनाकडे पुराव्यासहित तक्रारी केलेले आहेत… मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी कारवाई होत नसल्याने आज जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वामध्ये डफडे बजाव आंदोलन करण्यात आले… आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जाणार नसल्याचे सांगितलंय….