मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये बी ए च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान…
बुलढाणा (प्रतिनिधी)
जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास विद्यार्थ्यांना यश निश्चित मिळते असे प्रतिपादन शरद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर पाटील यांनी बुलढाणा येथील मॉडेल कॉलेजमध्ये आयोजीत कार्यक्रमात केलं
संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ द्वारा संचालित मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथे पदवी प्रदान समारंभ आज 10 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ एस आर बाठे हे उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलताना होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानंद संचालक डॉ केदार ठोसर सर हे होते यावेळी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन व सोबतच चिकाटीवृत्तीही असणे गरजेचे आहे. जीवन जगत असताना प्रत्येकाने समाधानीवृत्ती अंगी बाळगावी अस मत व्यक्त केल
सन 2019=20 वर्षात मध्ये बी ए ची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीच वितरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला विभाग प्रमुख प्रा चंद्रशेखर भांदकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे स्वरूप विशद केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रदीप डांगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्रीमती ताजने मॅडम मॅडम यांनी केले मॉडेल डिग्री कॉलेज मधील प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते