*एक विद्यार्थी एक वृक्ष” भारत वृक्षक्रांती मोहिमेला आज १५ ऑगस्ट पासून सुरुवात…*
बुलडाणा( प्रतिनिधी )
बुलडाणा जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीमचा शुभारंभ 15 ऑगस्ट चे औचित्य साधून राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते वृक्षलागवडीचे झाले यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ कमलताई बुधवत, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी सौ.भाग्यश्री विसपुते, जिल्हा उपवन संरक्षक अक्षय गजभिये , शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते
या वृक्षक्रांती मोहिमेत बुलडाणा जिल्ह्यातील 5 लाख 14 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर मोफत वृक्षरोपण देण्यात येणार आहेत वृक्ष संवर्धनासाठी व रुक्ष जगण्यासाठी राज्य सरकारने भारत वृक्ष क्रांती योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागामार्फत राबवावी यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचेही या भारत वृक्ष क्रांती संकल्पनेचे मुख्यप्रवर्तक ए एस नाथन यांनी यावेळी संगीलले