शेगाव ग्रामीण चे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांना पोलीस महासंचालक पदक बहाल
*शेगाव (प्रतिनिधी)* महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानाचे पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पो.स्टे.ला कार्यरत असलेले ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले होते. ते आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ठाणेदार सूर्यवंशी यांना शासकीय कार्यक्रमात बहाल करण्यात आले. पोलीस सेवेत उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना हे पदक त्यांना बहाल करण्यातआलेआहे.
पोलीस विभागात काम करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळेस चोखपणे कर्तव्य बजावत असताना नागरिकांशीही चांगले संबंध ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दरवर्षी पोलीस विभागाकडून विविध पदचिन्हे देऊन सन्मानित करण्यात येते.
1 मे या महाराष्ट्र दिनानिमित्ताने पोलीस महासंचालक यांचे पदचिन्हासाठी राज्यातील पोलिसां अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यानुसार आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुलढाणा येथे पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हे पदक त्यांना बहाल करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना मागील १५ वर्षाच्या पोलीस दलातील सेवा काळामध्ये नांदेड, नागपूर व सध्या शेगाव येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले गोकुळ सूर्यवंशी यांना आतापर्यंत पोलीस दलातील 150 च्या जवळपास विविध बक्षिसे प्राप्त झालेली आहेत. याशिवाय दरवर्षी राज्यभरातून पोलिस दलात उत्तम सेवा देणाऱ्या मध्ये त्यांचा समावेश करून त्यांना विविध पदचिन्हे देऊन सन्मानित करण्यात येते. हे विशेष !
खामगाव तालुक्यातील अंत्रज शिवारात सोन्याची नकलीनाणी देऊनगंडवणारी टोळी सक्रिय होती त्याटोळीचा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दोन वेळा कोंबिंग ऑपरेशन राबवून टोळीचा पर्दाफाश करीत त्यांच्या कडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.एका मोठ्या गुन्ह्या उघडकीस आणल्यात विशेष कामगिरी बद्दल बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांचा विशेष कामगिरी बद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार केले होते.*