*लोकसहभागातून उभारण्यात आलेला ऑक्सीजन प्लांट लोकार्पीत
बुलडाणा प्रतिनिधी
कोरोनाच्या – संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्राण हे प्राणवायू न मिळाल्पाने जाऊ नये या उद्देशाने लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण 15 ऑगस्ट औचित्य साधून करण्यात आलयं
कोरोना काळात ऑक्सिजन मुळे हाहाकार झाला आणि अनेक रुग्णांना आपला जीव ऑक्सिजन अभावी गमवावा लागलाय.. यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये आणि गरीब रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध व्हावा , यासाठी चिखली तालुक्यातील नागरिकांनी आणि सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्र येत ऑक्सिजन प्लांट उभारलाय.. काल 15 आगस्ट च्या सायंकाळी माजी केंद्रीयमंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलंय.. तर हा हा प्लांट एकट्या काँग्रेस पक्षाचे नेत्याचा नसून परिसरातील सर्वच राजकीय आणि सामाजिक लोकांचा असल्याने ऑक्सिजन वितरित करताना भेदभाव होणार नाही, त्यामुळे याचा सर्वाना फायदा होणार असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी केलेय.. यावेळी ज्यांनी या प्रकल्पाला मदत केलीय त्यांचा यावेळी सत्कार ही करण्यात आलाय.. या लोकार्पण कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच हा प्रकल्प भरण्यासाठी ज्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला त्याचेही सदस्य उपस्थित होते