गांधी जयंतीपासून जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान; बुलडाणा पालिकेने चालविली तयारी…
बुलडाणा ( प्रतिनिधी ) येत्या महात्मा गांधी जयंतीपासून जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येणार आहे, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत हे पर्यावरणपूरक मोहीम राबविण्यात येणार असून या अभियानाची निसर्गाशी निगडित पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वाशी सांगड घालण्यात आली आहे, *
जिल्ह्यातील 11 नगरपरिषद, 2 नगरपंचायत,10 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायत मध्ये हे अभिनव अभियान राबविण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग विभागाने निर्देश दिले आहे, 2 ऑक्टोबर ते 31 मार्च दरम्यान या अंतर्गत लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येतील, यासाठी खालील वर्गवारीनुसार 1500 गुण देण्यात येणार आहे,
काय आहे संकल्पना
पृथ्वी तत्वाशी संबंधित कामासाठी 600, वायू 100, जल 400, अग्नी 100 तर आकाश तत्व शी निगडित कामासाठी 300 अशी गुणसंख्या निर्धारित करण्यात आली आहे, पृथ्वी अंतर्गत वृक्षारोपण , त्यातील भारतीय प्रजाती, नवीन हरित क्षेत्राचा विकास, सार्वजनिक उद्याने, हरित क्षेत्राचे संवर्धन , घनकचरा व्यवस्थापन याचा समावेश आहे, वायू अंतर्गत प्रयोगशाळा मार्फत परीक्षण करण्यात आलेली वायू गुणवत्ता, धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला केलेले हरितकरण , उज्जवला योजनेची व्यापकता, नागरी भागात अयांत्रिक( पारंपरिक) वाहतुकीस प्रोत्साहन याचा समावेश आहे, जल तत्व अंतर्गत जल संवर्धन साठी राबविण्यात येणारे उपक्रम, रेन वाटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी-तलाव- नाले यांची स्वच्छता, सांडपाणी मैला व्यवस्थापन यांचा समावेश आहे, अग्नी अंतर्गत नूतनीकरण योग्य ऊर्जा स्तोत्राच्या वापरास प्रोत्साहन, सौरऊर्जेवर चालणारे दिवे, बायोगॅस प्रकल्प उभारणी, विद्युत वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट यांचा समावेश आहे,आकाश तत्व अंतर्गत पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती, विविध उपक्रम, त्यासाठी नागरिकांनी घेतलेली शपथ आदींचा समावेश आहे,
पर्यावरण दिनी बक्षीस वितरण
या संस्थांनी केलेल्या कामांचे 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे, त्याचा निकाल जागतिक पर्यावरण दिन म्हणजे 5 जून रोजी जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, राज्यातील प्रथम 3 महानगरे, 3 नगरपरिषद, 3 नगरपंचायत व 3 ग्रामपंचायतीना बक्षीस देण्यात येतील, जिल्हास्तरावर प्रत्येकी एका पालिका व ग्रामपंचायत ला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल, तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणारे 1 विभागीय आयुक्त, 3 जिखाधिकारी व 3 जीप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही गौरविण्यात येणार आहे,
*बुलडाणा पालिका सज्ज*
दरम्यान बुलडाणा पालिकेने नव्या दमाचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाचे सुसज्ज नियोजन करण्यात येत आहे, प्राथमिक चर्चेत करावयाच्या कामांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात येत आहे, स्वतः सीओनी पुढाकार घेतल्याने कर्माचारी सुद्धा रुची दाखवीत असल्याचे चित्र आहे, या अभियानाची माहिती देणाऱ्या मुख्याधिकारी पांडे यांना मात्र यशस्वी अंमलबजावणीसाठी हजारो बुलडाणेकर, सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, बुलदाण्यातील नागरिकांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे