भाजपा युवा मोर्चा तर्फे युथवॉरियर्स संकल्प यात्रेची सुरुवात
सिदखेडराजा= आत्मनिर्भर योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर कोटी रुपयांची योजना दिली आहे या योजनेचा फायदा युवकांना देण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये युथवॉरियर्सच्या माध्यमातून संवाद यात्रा काढल्या जात असल्याची भारतीय युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रभारी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने 23 ते 26 ऑगस्टपर्यत पश्चिम विदर्भात युथवॉरियर्स संवाद यात्रा काढण्यात येणार आहे यात्रेची सुरुवात 23 ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मपासून झाली भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून युथवॉरियर्स संवाद यात्रेला सुरुवात केली त्यानंतर सिदखेडराजा टाउन हॉल येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले
यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संवाद यात्रेचा स्वरूप विषद केलं यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रातील 25 लक्ष युवकांची नोंदणी या संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प आहे या संवाद यात्रेच्या माध्यमातून जोडलेल्या युवकांचा वापर राजकीय फायद्यासाठी न करता त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं व सशक्त भारत निर्माण करण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून रणकंदन माजले असताना .. या सरकार या 2022 च्या सर्व निवडणूका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्या आहेत.. ओबीसींना डावलून सर्व जागांवर धनदांडगे निवडून आणायचे असल्याचा आरोप भाजपचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.. या सरकार ओबीसी वर अन्याय करत असून ओबीसी आरक्षणाची फाईल 1 महिना झाला तरी मंत्रालयात का पडून आहे? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे..
राज्यभरातील युवक-युवतींच्या अनेक प्रश्नना वाचा फोडण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून काम केले जात आहे परंतु राज्य सरकार या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला राज्यातील 18 ते 25 वयोगटातील युवकांना जोडण्याचा संकल्प विक्रांत पाटील यांनी केली या यात्रेचा समारोप 26 ऑगस्टला अमरावती येथील अंबामातेच्या मंदिरात होणार असल्याचे सांगण्यात आले