- *बुलडाणा येथे राष्ट्रीय पोषण महीन्याचे उद्घाटन*
— बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपुर्ण सष्टेबर महीना हा राष्ट्रीय पोषण महा म्हणुन साजरा केला जाणार आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे 2 सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय पोषण महा सप्ताहाचे उद्घाटन व जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा पवार जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ पडघान यावेळी उपस्थित होत्या या पोषण महा अंतर्गत साजरा करावयाच्या कार्यक्रमासंदर्भात यावेळी माहिती देण्यात आली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सही पोषण देश रोशन प्रतिज्ञा देण्यात आली … या राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम साजरे केल्या जाणार असून यासंदर्भात ची माहिती या बैठकीत देण्यात आली या बैठकीला जिल्हा परिषदेच्या विविध विभागचे प्रमुख उपस्थित होते राष्ट्रीय पोषण महा अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होऊन याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी यावेळी केले राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन ही सरकारच्या योजना गावा-गावात यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी केला
हा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यामागे प्रमुख उद्देश आहे . पोषण महिना मध्ये कोविड-१९ च्या मार्गदर्शिक सुचानांचे पालन करून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.पोषण वाटिका तयार करणे गावस्तरावर पोषण रॅली काढणे अंगणवाडी केंद्र , शाळा, उपकेंद्र, ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक जागेवर पोषण वाटिका तयार
करणेMSRLM मार्फत गावस्तरावर परसबाग संदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षिकेपोषण वाटिका / पोषण बाग स्पर्धेचे आयोजन कोविड लसिकरणाबाबत जनजागृती
मातृ वंदना सप्ताह साजरा करणे अंगणवाडी , शाळा,उपकेंद्रे,आणि ग्राम पंचायत स्तरावर स्तनदा माता, गरोदर महिला,किशोरवयीन मुली यांचे करिता आयुष विभागामार्फत योग सत्रांचे आयोजन , अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे १००% कोविड लसीकरण, गर्भवती महिला आणि स्तनदा माता साठी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन अनेमिया मुक्त भारताच्या अनुषंगाने गर्भवती महिलासाठी अॅनेमिया तपासणी व उपचार समुपदेशन,
तिसऱ्या तिमाहीतील गर्भवती महिलासाठी प्रसूती नंतर एका तासाच्या आत स्तनपान या विषयावर online मार्गदर्शन,
गर्भवती महिला व किशोरीमुली साठी ग्रहभेटीच्या माध्यमातून पोषण आहारातून आणि लोह फोलिक अॅसिड च्या सेवनाबद्दल समुपदेशन, प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये किशोरवयीन मुलींना IFA tablet चे वाटप व सेवनाचे मार्गदर्शन, शासकीय व अशासकीय कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी-५ मिनिटे योगा प्रोटोकॉल प्रशिक्षण,
१००% लाभार्थ्याचे तरंग सुपोषित महाराष्ट्र या पोर्टल वरती रजिस्ट्रेशन जनजागृती ,पोषण आहार पाककृतीचे अंगणवाडी सेविकमार्फत लाभार्थ्यांना प्रशिक्षण व पाककृती स्पर्धेचे आयोजन स्थानिक उपलब्ध पोषक अन्नधान्याचे पाककृतीचे गाव स्तरावर प्रदर्शन,जल जीवन मिशन अंतर्गत १००% अंगणवाडी व शाळांना नळ कनेक्शन देणे,अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करून बालकांना संदर्भ सेवा व उपचार करणे
, गर्भवती महिला किशोरी मुली यांच्या साठी आरोग्य व पोषण संदर्भात अंगणवाडी शाळास्तरावर प्रश्नमंजुषा, निबंध,पोस्टर यासारख्या स्पर्धेचे आयोजन करणे, माझे मुल माझी जबाबदारीच्या अनुषंगाने कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी व उपचार, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोज, कृषी विभागामार्फत सेंद्रिय पालेभाज्या, फळभाज्या व पिकांचे महत्व व उत्पादन या विषयी ग्रामस्तरावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.