ग्रामीण भागातील पाणिपुरवठा योजनांचे कामे त्वरीने पुर्ण करण्यासाठी जिवन प्राधिकरण विभागाची रिक्त् पदे त्वरीत भरा-खासदार प्रतापराव जाधव.
(बुलडाणा प्रतिनीधी)
महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे त्वरीत भरुन ग्रामीण भागातील नळ पाणिपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने पुर्ण करण्याची मागणी केंद्रिय ग्रामीण विकास समितीचे अध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहेत.
बुलडाणा जिल्हयातील पाणिपुरवठा योजना पुर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असुन त्याचे मुख्य् कारण हे जिवन प्राधिकरण विभागात कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामाचा अतिरीक्त् बोजा कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणिपुरवठा योजनांच्या कामाची गती संथ झाली आहे. बुलडाणा जिवन प्राधिकरण विभाग अंतर्गत् येणाऱ्या बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद येथे आकृती बंधानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे 80 पदे मंजुर आहेत. सध्या कार्यरत पदे केवळ 17 भरलेली असुन 63 पदे रिक्त् आहेत. रिक्त् पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असुन पाणिपुरवठयाच्या योजना पुर्णत्वास जाण्यास अडचण निर्माण होत आहे. तेव्हा रिक्त् पदी तात्काळ भरावी अशा आशयाची मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणिपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन खासदार प्रतापराव जाधव यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते.