आरोग्य विभागाची परिक्षा ऐनवेळी रद्द ….
*दिनांक 25सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील परीक्षा बाह्य स्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.*
न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा पुढे ढकलली लागत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिक्षार्थींची माफीही मागितली आहे.परीक्षांची तारीख येत्या आठ ते दहा दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.परीक्षेची जबाबदारी न्यासाची असताना देखील त्यांना टार्गेट देऊनही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही.सेलूतील काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळून आल्या असंही टोपे यांनी सांगितलं.आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या 6 हजार 200 जागांसाठी या परीक्षा होणार होत्या.मात्र न्यासाकडे परीक्षेची सर्व जबाबदारी असताना न्यासा जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम ठरली असं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.