: विद्युत शॉक लागून इसमाचा मृत्यू
खामगाव =शेतामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमाला डीपीवरील पाण्याची मोटार सुरु करत असतांना विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास माटरगाव जवळील डोलारखेड शिवारात उघडकीस आली.
माटरगाव येथील सोपान महादेव सपकाळ वय ४२ हे नेहमी प्रमाणे ८ ऑक्टोंबर रोजी गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते.दुपारच्या सुमारास गुरांना पाणी पाजण्याकरिता स्टार्टर सुरु करीत असतांना त्यांना विद्युत शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब नागरिकांना कळताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती जलंब पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये पाठविण्यात आला .