बुलडाणा जिल्ह्यासाठी मिळाल्या 30 रूग्णवाहिका; ग्रामीण भागातील रूग्णांना होणार फायदा..!
– महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून आज बुलडाणा जिल्ह्याला 30 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहे. याचा फायदा ग्रामीन भागातील जनतेला होणार आहे.यावेळी पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे ,खा.प्रतापराव जाधव यांनी रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममुर्ती,जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार,आ.राजेश एकडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती…