मातृतीर्थ सिदखेडराजात व्यापक स्वच्छता मोहिम! 14 पर्यंत ऐतिहासिक परिसर करणार लख्ख!! 

0
52

मातृतीर्थ सिदखेडराजात व्यापक स्वच्छता मोहिम! 14 पर्यंत ऐतिहासिक परिसर करणार लख्ख!!

बुलडाणा

महाराष्ट्राची अस्मिता अन प्रेरणास्रोत राजमाता जिजाऊंचे माहेर अन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे आजोळ असलेल्या सिंदखेडराजा चा सर्वांगीण विकासाला नव्याने चालना मिळण्याची सुखद चिन्हे असतानाच स्थानिक पातळीवर त्याला समांतर अशी मोहीम राबविण्याच्या सुखद हालचाली सुरू झाल्या आहे. मातृतीर्थ मधील ऐतिहासिक वास्तुचे परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व सिंदखेडराजा वासी एकवटले आहे. यावर आज झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.*

येत्या11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान लखुजी जाधवांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक नगरीत ‘ ध्यास नवा, मातृतीर्थ स्वच्छतेचा’ हे अभिनव अभियान राबविण्यात येणार आहे. नुकतेच सिंदखेडराजा एसडीओ पदाची सूत्रे स्वीकारणारे भूषण अहिरे यांच्या संकल्पनेतून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंदखेडराजा विकास आराखडा संदर्भातील बैठकीत त्यांनी मांडलेल्या या संकल्पनेचे उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गडगडाटने स्वागत केले. *
*असे आहे नियोजन*
दरम्यान यासंदर्भात संपर्क केला असता, त्यांनी ‘ बुलडाणा लाईव्ह’ सोबत बोलताना मोहिमेची रूपरेषा विशद केली. तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी, अध्यक्ष अतिष तायडे, उपाध्यक्ष रुक्मिना तायडे, शिवमती तायडे, महाविद्यालयांचे प्राचार्य, यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत मोहिमेचे सुसज्ज नियोजन करण्यात आल्याचे अहिरे यांनी सांगितले.यानुसार 11 तारखेला चांदणी तलाव, रंगमहाल, 12 ला निलकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, रेणुका मंदिर, समाधी स्थळ तर बुधवार व गुरुवारी मोती तलाव, पुतळा बारव परिसर लख्ख करण्यात येईल. या मोहिमेत अधीकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, लोक प्रतिनिधी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, शिवप्रेमी, जिजाउभक्त, स्वयंसेवी व सामाजिक संस्था, संघटना असे सर्व समाज घटक सहभागी होणार आहे. चारही दिवस सकाळी 7. 30 ते 10 वाजेदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे एसडीओ अहिरे यांनी या चर्चेत सांगितले. 14 तारखेला जिल्हाधिकारी एस, रामामुर्ती भेट देऊन पाहणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here