पीक नुकसानीचा क्लेम मंजूर करण्यासाठी विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे मागत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप*
*बुलडाणा* – मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेत पिकांचे नुकसान झाला आहे या नुकसानीचा क्लेम मंजूर करण्यासाठी पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत आहे यामध्ये शासकीय अधिकारीही गुंतलेले असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे आहे ते पुढे म्हणाले की मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे अनेक जमिनी खरडून गेल्या आहेत विहिरीत खचल्या आहेत बोरवेलमध्ये गाळ साचलेला आहे सोयाबीन कापूस उडीद मूग ही सर्वच पिके वाहून गेलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडून गांभीर्याने घेतले जात नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोचण्याच्या दृष्टिकोनातुन आपण हा दौरा काढला आहे असं त्यांना सांगीतले 11 ऑक्टोंबरला राज्यातील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीने लखिंमपुर घटनेच्या निषेधार्थ जो बंद पुकारण्यात आला होता तो बंद शेतकरी संबधीत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ह्या बंदला पाठिंबा दर्शविला होता परंतु हा बंद कशासाठी होता हे सांगण्यात महा विकास आघाडीचे नेते कार्यकर्ते कमी पडल्याचा खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली बंद करण्यासंदर्भात महा विकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क केला नाही किंवा विश्वास घेतलं नाही केवळ हा बंद शेतकऱ्यांसाठी असल्याने वर्तमानपत्रातून वाचलेल्या बातमीच्या आधारे कोणताही विलंब न करता आम्ही या बंदला शेतकरी म्हणून पाठिंबा दिल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या आकस्मिक मृत्यू नंतर त्यांच्या घरी सांत्वन पर भेटीसाठी ते आज बुलढाणा येथे आले होते त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते
*Yuvaraj wagh buldana*