शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसगट मदत करणार पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे

0
147

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसगट मदत करणार
पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे
सिंदखेड राजा भगवान साळवे
अतिवृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. संकटामागून संकट आली आहेत. शेतकऱ्यांना. संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज देण्यात येत आहे त्यामुळे या अस्मानी संकटावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट मदत करू अशी ग्वाही राज्याचे औषध व अन्न प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली यावेळी अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले धुवाधार पावसाने शेतात उभी असलेली पिके सोडून गेली उडीद मूग ही पिके शेतात सोडून गेली त्यासोबत सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले काही ठिकाणी तर सोयाबीन सोडण्याची वेळ झाली नाही अनेक ठिकाणी सोयाबीन ला कोमल आली त्यामुळे या अस्मानी संकटात शेतकरी पूर्ण खचून गेला आहे या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे कुठल्याही पंचनामा न करता वेळप्रसंगी निकषांमध्ये बदल करून या शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात येईल जिल्ह्यात मंडळाच्या ठिकाणीच पर्जन्यमापक यंत्र आहे त्यामुळे पाऊस या शेतात पडला आणि शेजारील शेतात पडला नाही अशी परिस्थिती येथे बघायला मिळाली आहे पावसाची नोंद बरोबर होत नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे येत्या काळात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये हे पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात येतील असे ही पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले यावेळी विविध विषयावर पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांनी मलकापूर पांग्रा परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांनी सदर सरसगट मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here