विधान परिषदेच्या जागेसाठी उद्या मतदान आमदार गोपीकिशन बाजोरिया वसंत खंडेलवाल यांची प्रतिष्ठा पणाला 

0
131

विधान परिषदेच्या जागेसाठी उद्या मतदान आमदार गोपीकिशन बाजोरिया वसंत खंडेलवाल यांची प्रतिष्ठा पणाला

बुलढाणा अकोला वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी उद्या निवडणूक होत असून सकाळी आठ वाजता पासून मतदानाला प्रारंभ होणार आहे यावेळची विधानपरिषद निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे.महाविकास आघाडीच्या वतीने विधान परिषदेचे आमदार व शिवसेनेचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्योजक वसंत खंडेलवाल हे निवडणूक रिंगणात असून यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपाच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा ‘ जॅकपॉट ठरू शकतात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगणार आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे 396 मते आहेत तर भाजपाकडे 244 मते आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार आहेत.

या निवडणुकीत एकूण 822 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दावे व हरकती निवडणूक मागितल्यानंतर विभागाने अंतिम यादी जाहीर केली असून अकोला जिल्ह्यात 287, वाशिम 168 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 367 मतदार आहेत.यात 385 पुरुष तर 437 स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा निर्णायक ठरणार आहे. राज्यात महाविकास विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. पण या निवडणुकीत सर्वांच लक्ष हे वंचित बहुजन आघाडी कडे आहे.कारण वंचित बहुजन आघाडी कोणाकडे आपला कौल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here