अकोला – बुलडाणा – वाशीम विधानपरिषदेसाठी  मतदानाला सुरुवात .. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांची प्रतिष्ठा पणाला.

0
103

अकोला – बुलडाणा – वाशीम विधानपरिषदेसाठी  मतदानाला सुरुवात .. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांची प्रतिष्ठा पणाला.

बुलडाणा   – अकोला बुलडाणा वाशीम विधानपरिषदेसाठी आज मतदान होणार असून सकाळी 8 वाजता मतदानासाठी सुरूवात झालीय..

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे 396 मते आहेत तर भाजपाकडे 244 मते आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार आहेत या निवडणुकीत एकूण 822 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दावे व हरकती निवडणूक मागितल्यानंतर विभागाने अंतिम यादी जाहीर केली असून अकोला जिल्ह्यात 287, वाशिम 168 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 367 मतदार आहेत.यात 385 पुरुष तर 437 स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा निर्णायक ठरणार आहे. राज्यात महाविकास विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक होत आहे. पण या निवडणुकीत सर्वांच लक्ष हे वंचित बहुजन आघाडी कडे आहे.कारण वंचित बहुजन आघाडी कोणाकडे आपला कौल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बुलडाणा जिल्ह्यात 367 मतदार असून नगर पालिका सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांचा यात समावेश आहे.. तर जिल्हयात 11 मतदान केंद्र असून 66 अधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी का मतदान प्रक्रियेसाठी लागली आहे.. मतदानची वेळ जर सकाळी 8 वाजता सुरु झाली असली तरीही मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असल्याने उशिरा मतदान करतील.. प्रशासनाने मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी केली असून कोव्हिडं नियमाचे पालन ही या ठिकाणी तंतोतंत होत आंहे.. या मतदान संघासाठी उमेदवार असलेलं गोपिकीशन बाजोरिया आणि वसंत खंडेलवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here