बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात एसटी बसवर दगडफेक
एसटी कर्मचार्यांचा संपाचा उद्रेक .!
बुलडाणा – एसटी कर्मचार्यांच्या संपाचा प्रश्न अजूनही सुरुच असून प्रशासन आणि संपकर्यांमध्ये कुठलाच तोडगा निघतांना दिसत नसल्याने प्रशासनाने विविध आगारातून मात्र बस फेर्या हळुहळू सुरु केल्या. आज चिखली-बुलडाणा ही बस प्रवासी घेवून बुलडाणा बसस्टॅण्डवर पोहोचली परंतु बुलडाणा येथून दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी चिखलीकडे परत जातांना या बसवर जयस्तंभ चौकात दगडफेक झाली।
. दगडफेक कुणी केली हे माहित नाही परंतु 25 ते 40 वर्षे वयोगटातील हा अज्ञात युवक आहे. या दगडफेकीनंतर बसचे काच फुटले. बसमध्ये तीन प्रवासी होते. बसचालक एस.पी. खरात यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून एसटीचा संप चिघळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये..