सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय नसल्याने भावासाठी झगडावं लागतं= रविकांत तुपकर .* – –
बुलडाणा = सोयाबीन कापसाला राजाश्रय नसल्यामुळे शेतकऱ्यांना भाव वाढीसाठी झगडावं लागतं 9 टक्के क्षेत्र असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहेत परंतु त्या तुलनेत सोयाबीन कापूस उत्पादकाला मिळत नाही अशी खंत ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली
विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भाववाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनात्मक भूमिका घेतली होती त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार सोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सोयाबीनचे भाव वाढले हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे मतही त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले पिक विमा योजने संदर्भात बोलतांना ते म्हणाले की शेतकरी आणि सरकार करोडो रुपये पिक विमा कंपनीला देते मात्र त्या तुलनेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही करोडो रुपयाचा फायदा पिक विमा कंपनीला होत आहे तेव्हा राज्य सरकारने पीक विमा संदर्भात वेगळी भूमिका घ्यावी असे असे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी यांनी केले…
या पत्रकार परिषदेनंतर मोताळा तालुक्यातील अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना मध्ये प्रवेश घेतला आहे