बुलडाण्यात आढळला पहिला ओमीक्रॉनचा पॉझिटिव्ह रुग्ण…
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोणा रुग्णांची आकडेवारी शून्यावर येत नाही तोच संपूर्ण जगभरात भीती निर्माण झालेल्या ओमीक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे, तर आज बुलडाणा जिल्ह्यातील पहिला ओमीक्रॉन चा रुग्ण आढळला असून शहरांमध्ये एकच खळबळ उडालीये…
– गेल्या आठवड्यापूर्वी बुलडाणा शहरातील सर्कुलर रोडवर राहणारा 65 वर्षीय व्यक्ती हा दुबईवरून परत आल्याने त्याची कोरोणा चाचणी करण्यात आली, ही चाचणी पॉझिटिव आल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले, आणि त्याचे नमुने हे ओमीक्रॉन चाचणी साठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, याचा रिपोर्ट आज प्रशासनाला प्राप्त झाला असून, हा रुग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव असण्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे, या रुग्णावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता कोविड नियमांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे..