मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत च्या 21 डिसेंबरला…प्रशासनाची मतदान तयारी पूर्ण

0
73

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत च्या 21 डिसेंबरला…प्रशासनाची
मतदान तयारी पूर्ण

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायत आणि संग्रामपूर नगरपंचायतसाठी उद्या 21 डिसेंबर ला मतदान होत असून निवडणूक विभागाने पूर्वतयारी पूर्ण केलीय.. तर आज मतदान पेट्या ही मतदान केंद्रावर रवाना झाल्यात. बुलडाणा जिल्ह्यतील दोन्ही नगरपंचायतच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मत पेट्या रवाना झाले असून मोताळा नगरपंचायत च्या 13 जागेसाठी 49 उमेदवार रिंगणात आहेत, तर 65 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले 13 मतदान केंद्र आहेत.. तर 6258 मतदार आपला हक्क बजावणार आहे..
दुसरीकडे संग्रामपूर नगर पंचायत साठी सुदधा उद्या मतदान होत असून याठिकाणी सुद्धा 13 जागेसाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत.. तर मतदान प्रक्रियेसाठी 65 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेय असून 13 मतदान केंद्र असणार आहेत..सकाळी 7 = 30 वाजेपासुन मतदान सुरू होणार असून सायंकाळी 5 = 30 वाजेपर्यंत मतदान होईल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here