खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी आज झाली मुंबईत बैठक
जालना खामगाव रेल्वेमार्ग संदर्भात आज मुंबई येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वे विभागाचे अधिकारी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्ह्यातील आमदार यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये या रेल्वेमार्ग संदर्भात चर्चा करण्यात आली
लोकसभेचे हिवाळी अधिवेशमध्ये केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या भेट घेवून या रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होत विदर्भ-मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसह बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा खांमगाव-जालना रेल्वे मार्ग असणार आहे.
शेतकरी आत्महत्या ग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात भूमिपुत्रांना रोजगार निर्माण करून तर ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनाला चालणा देण्यासाठी या रेल्वे मार्गाची गरज आहे
आज मुंबई येथे झालेल्या बैठकीला सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व सेंट्रल रेल्वे चे सर्व प्रमुख अधिकारी वर्ग उपस्थित होते.