: *WhatsApp ग्रुपवर अश्लील मेसेज टाकल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी निलंबित*
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आदेश काढून केलं निलंबित.
शिक्षकांसह महिला शिक्षक संघटना झाल्या होत्या कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक
: एका महिलेचा नामोउल्लेख करीत रात्रीच्या वेळेस शेगाव पंचायत समितीअंतर्गत कार्यालयीन कामकाजसाठी असलेल्या व्हॉट्सॲप गृपवर अश्लील मेसेज टाकल्या प्रकरणी पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट याना घटनेच्या ८० दिवसानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आदेश कडून निलंबित केले आहे.
: शेगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारीपदाचा प्रभार पहुरजिरा येथील केंद्रप्रमुख प्रकाश केवट यांच्याकडे होता. यावेळी पंचायत समितीअंतर्गत कार्यालयीन कामकाज असलेल्या व्हॉट्सॲप गृपवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांनी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी अश्लील मॅसेज टाकला होता. कार्यालयीन कामकाजाच्या व्हाट्सॲप गृपवर शासकीय कर्मचारी असलेल्या एका महिलेच्या नावासह अश्लील मजकूर असल्याने गृपमध्ये असलेल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापकांची कुचंबणा यांची झाली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यानेच मॅसेज टाकल्याने अनेक मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काहींनी केवट यांना माहितीही दिली होती की, आपल्याकडून व्हाट्सअप गृपमध्ये अश्लील मॅसेज टाकण्यात आला आहे
तो डिलीट करावा मात्र डिलिट एव्हरीवन करण्याऐवजी त्यांनी “डिलीट मी” केला त्यामुळे तो मॅसेज तसाच राहिला. या घटनेनंतर काही शिक्षक महिला आणि शिक्षकांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला यावेळी अश्लील मेसेज मध्ये उल्लेख असलेल्या महिलेने तक्रार केल्यास कारवाई होऊ शकेल असे सांगत त्यावेळी परत पाठवण्यात आले होते. मात्र असे असतानाही तब्बल ८० दिवस उलटल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढून शेगाव गटशिक्षण अधिकारी प्रकाश केवट यांना निलंबित केले आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी हा आदेश कडून तब्बल ८० दिवसांनंतर निलंबित केले असून त्यांचे मुख्यालय जळगाव जामोद पंचायत समिती ठेवण्यात आले आहे.