*प्रेम प्रकरणातून युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला*
खामगाव : पळून जाऊन प्रेम विवाह केलेले प्रेमी युगल स्वसंरक्षणासाठी खामगावच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री पोहोचले असल्याची माहिती मिळाल्यावरून युवतीचे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.अन भलतंच घडलं…याठिकाणी युवतींकडे मंडळींनी युवकांसोबत वाद घालत त्याचेवर चाकूने प्राणघातक वार केले. यामध्ये युवक हा गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात व नंतर अकोला येथे हलविण्यात आले आहे.
: खामगाव शहरातील सती फैल भागातील रहिवाशी रघु विजय तिवारी वय २६ या युवकाचे काही दिवसांपूर्वी याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळल्याने ते पळून गेले होते. ३ महिने उलटल्यानंतर मंगळवारी हे प्रेमी युगल स्वसंरक्षणासाठी खामगावच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री पोहोचले आणि जबाब नोंदवला. दरम्यान याची कुणकुण युवतीच्या नातेवाईकांना मिळाल्यावरून काही युवक शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोर पोहचले आणि ऑटो मध्ये बसलेला रघु तिवारी या युवकासोबत वाद घालत त्याचेवर चाकूने वार केले. यामध्ये युवक हा गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात व नंतर अकोला येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे खामगाव शहरामध्ये खळबळ निर्माण झाली असून सदर घटना हि चक्क पोलीस स्टेशनच्या समोर घडल्यामुळे शहरात कायदा आणि पोलिसांचा धाक आहे कि नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.