पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्याचे पालकमंत्र्यांची निर्देश…
जिल्ह्यातील पत्रकारांनी दिले पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन…
पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी…
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बनावट बायोडीजल वर झालेल्या कारवाई संदर्भात बातमी च्या माध्यमातून पाठपुरावा करू नये यासाठी मलकापूर येथील ऍड इफ्तेकार खान या बायोडिझेल माफिया ने पत्रकार वसीम शेख व पत्रकार गजानन ठोसर यांना फोन करून अश्लील संभाषण करत , हात-पाय तोडण्याची धमकी दिली… यासंदर्भात बुलडाणा शहर पोलीस स्टेशन आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या, मात्र आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज संपूर्ण जिल्हाभरातील पत्रकारांनी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी,आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले आहे… त्यावर पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकाराला धमकावणाऱ्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी असे निर्देश ठाणेदारांना दिले आहेत…