बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 1 ते 18 वयोगटातील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे
बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसा गणित वाढत चालला असल्यामुळे आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व प्रशासनातील अधिकारी यांची बैठक झाली या बैठकीमध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलं त्यानुसार जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील 1 ते 8 वर्ग शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे