बुलढाणेकरानो सावधान… एकाच दिवशी 42 रुग्ण…कोरोना वाढतोय…

0
347

बुलढाणेकरानो सावधान… एकाच दिवशी 42 रुग्ण…कोरोना वाढतोय…

  • कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसा गणित वाढत चालला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज तब्बल 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे आता जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 107 वर जाऊन पोहचली आहे
महाराष्ट्रामध्ये कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला असतानाच बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही कोरोना रुग्णसंख्या ही वाढत चालली आहे या पार्श्‍वभूमीवर काल कोरोना संदर्भात आढावा घेणारी बैठक पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यानंतर 1 ते 8 वर्ग शाळा बंद करण्यात आल्या तर आज 8 जानेवारीला कोरोना संदर्भातील रिपोर्ट प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला यामध्ये 42 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे बाप निष्पन्न झाले आहे यामध्ये सर्वाधिक एक्स 21 रुग्ण हे बुलढाणा शहरांमधील आहे त्या पाठोपाठ खामगाव सात शेगाव 4 मलकापूर 3 लोणार देऊळगावराजा प्रत्येकी 2 मेहकर, नांदुरा चिखली प्रत्येकी 1 असे एकूण 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे ….
जिल्हामुख्यालय बनतेय कोरोनाचा हॉटस्पॉट… एकाच दिवशी आढळ्ले 21 रुग्ण…

 

जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाणा शहर सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालला आहे 8 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये तब्बल 21 रुग्ण हे बुलढाणा तालुक्यातील आहे त्यामुळे बुलढाणेकर आणि वेळीच सावध होणे गरजेचे आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here