Slug : बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान नरेद्र मोदीं विरोधात काँग्रेसची निदर्शने…काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले पोलीसांनी ताब्यात
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज यांच्या वक्तव्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी निदर्शने सुरू आहेत बुलडाणा येथे भाजपा कार्यालयासमोर येउन कॉग्रेस कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी
शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नरेंद्र मोदींनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केलीत. आणि जोरदार घोषणाबाजी केली.
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवण्याचे काम केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात आणि राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून आज भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचे काल सांगण्यात आले होते. दरम्यान आज बुधवारी शेगाव शहरासह जिल्हा भरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्याविरुद्ध शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. . मोदी यांनी जनतेची माफी मागावी कारण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. दरम्यान या ठिकाणीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.