सावधान ….बुलडाण्यातील मिर्झा नगरमध्ये बिबट्याचा वावर

0
228

बुलडाण्यातील मिर्झा नगरमध्ये बिबट्याचा वावर,समाजसेवक मो.अजहर कडून खबरदारी घेण्याचे आवाहन

बुलडाणा शहरातील जंगलाला लागूनच असलेल्या मिर्झा नगर येथे बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने मिर्झा नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.नागरिकांनी सकाळी मॉर्निग वाकला जात असतांना किंवा मिर्झा नगर परिसरात येत असतांना बिबट्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन करीत या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रभाग क्र.2 च्या नगरसेविका यांचे पती समाजसेवक मो.अजहर यांनी केली आहे.

शहरातील अंतिम भागामध्ये मिर्झा नगर हा परिसर येतो.या परिसराला लागूनच भले मोठे जंगल आहे. मिर्झा नगर परिसराला लागून असलेल्या परिसरात अनेक वेळा अस्वल फेरफटका मारत असतात.मात्र मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मिर्झा नगर परिसरातील सालेहा अपारमेन्ट जवळील झाडा-झुडपात एक मोठा बिबट्या येवून बसल्याचा काही नागरिकांना दिसला.यावेळी नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून पड काढला.यामुळे मिर्झा नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.सदर प्रकाराची माहिती प्रभाग क्र.2 च्या नगरसेविका यांचे पती समाजसेवक मो.अजहर यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना देताच तुपकरांनी वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची सूचना केली आहे.दरम्यान नागरिकांनी सकाळी मॉर्निग वाकला जात असतांना किंवा मिर्झा नगर परिसरात येत असतांना बिबट्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन करीत या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रभाग क्र.2 च्या नगरसेविका यांचे पती समाजसेवक मो.अजहर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here