‘त्या’ अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा जिल्हा पत्रकार संघाची मागणी

0
238

पत्रकाराला धमकी देणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा
जिल्हा पत्रकार संघाची जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांकडे मागणी

बुलडाणा (प्रतिनिधी) खामगांव येथील साप्ता. बुलडाणा बातमीपत्र चे संपादक आकाश संतोष पाटील यांनी त्याच्या वृत्तपत्रात खामगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्ही.एस. चव्हाण यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची बातमी प्रसिध्द केल्यानंतर त्यांना अश्‍लील भाषेत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात त्या अधिकाऱ्यावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरीता आज दि. 12 एप्रिल 2022 रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या वतिने जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी जिल्हाधिकारी दिनेश गिते यांना निवेदन देवुन गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या दालनात उपस्थित असलेल्या चिखली येथील आ. सो. श्‍वेताताई महाले यांनी सुध्दा दलख घेवुन संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून पत्रकारांना न्याय देण्याची विनंती जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली.
खामगाव येथील पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व्ही.एस. चव्हाण यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बातम्यांच्या माध्यमातून उघड केल्यामुळे साप्ता. बुलडाणा बातमीपत्र चे संपादक आकाश संतोष पाटील यांच्यावर चिडून जावुन व्ही.एस. चव्हाण यांनी त्यांचा कर्मचारी जाधव यांच्या मोबाईल क्र. 9881619041 यावरून दि. 1 फे ब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2.47 वाजता च्या दरम्यान पत्रकार आकाश संतोष पाटील यांना फ ोनवरून अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली. व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आकाश पाटील यांनी दि. 2 फे ब्रुवारी 2022 रोजी खामगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीची कोणतीही दखल न घेता आजपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर दि. 4 मार्च 2022 राजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. मात्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी फ क्त तोंडी आश्‍वासन देवुन गुन्हा दाखल होईल असे सांगुन तुम्ही शांतता ठेवा असे सांगीतले.
त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्ही.एस. चव्हाण यांच्याकडून पत्रकार आकाश पाटील यांच्या विरूध्द खंडणीची खोटी तक्रार घेवुन व्ही.एस.चव्हाण यांच्या विरूध्द दिलेली तक्रार वापस घेण्याचा दबाव पत्रकार पाटील यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून टाकल्या जात आहे. या अन्यायाच्या विरोधात आकाश पाटील यांनी दि. 11 एप्रिल 2022 पासुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या मुजोर अधिकाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरीता जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिक्षक अरविंद चावरीया व निवासी जिल्हाधिकारी दिनेश गिते यांची भेट घेवुन निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार राजेश डिडोळकर, सिदार्थ आराख, नितिन शिरसाठ, गजानन धांडे, सुभाष लहाने, भानुदास लकडे, वसिम शेख, युवराज वाघ, संजय जाधव, प्रशांत खंडोरे, गणेश सोळंके, संदिप वानखेडे, संदिप चव्हाण, रणजित राजपूत, आनंद गायगोळ, रूपेश कलंत्री, विनोद भोकरे, महेश देशमुख, किरण मोरे, गणेश उबरहंडे, आदेश कांडेलकर, वैभव देशमुख, शेख असीफ , शौकत शाह यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here