देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला जय जय…. हनुमान… श्री रामचंद्र प्रभू चा परमभक्त असलेल्या हनुमंत राय यांचा आज जन्मदिवस चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे त्यानिमित्य बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे 105 फूट उंच महाकाय हनुमानाची मुर्ती आहे या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा सकाळीच बालाजी संस्थानच्यावतीने करण्यात आली तर हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आला आहे नांदुरा येथील 105 फूट महाकाय हनुमंतराया ही मूर्ती देशातील सर्वात उंचीचे असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही या मूर्तीची नोंद झाली आहे हनुमान जयंतीनिमित्त या मूर्तीला सकाळीच जलाभिषेक करण्यात आला तर सायंकाळी चार वाजता ढोल ताशाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात येणार आहे