[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दिसणार मेहकर येथील फर्दापुर टोल प्लाझावर… नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केल आवाहन ….
बुलडाणा( प्रतिनिधी)
नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मेहकर येथील फर्दापुर टोल प्लाझा येथे दाखवण्यात येणार आहे . या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे अस आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केलायं
महाराष्ट्राच्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासात भर पाडणारा नागपूर मुंबई स्वर्गीय हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा बुलढाणा जिल्ह्यातून मेहकर ,देऊळगाव राजा, सिदखेडराजा या तालुक्यातुन 89 किलोमीटरचे अंतर पार करून जात आहे .या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर ही दोन्हीही मेट्रो सिटी बुलढाण्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्याला जोडल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठया प्रमाणात भर पडणार आहे .. दळणवळणा क्षेत्रातून रोजगार, स्वंयरोजगारच्या संधी मिळून देण्यास ह्या महामार्गाचा फायदा होणार आहे .या महामार्गामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या शेगाव ही तीर्थस्थळे ऐतिहासिक आणि जागतिकस्थळे जोडल्या जाणार आहे.या समृद्धी महामार्गसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक शेतजमीन धारकांचा मोठा विरोध होता तेव्हा खासदार प्रतापराव जाधव यांनी गावांमध्ये जाऊन ग्रामसभा घेऊन या महामार्गासाठी जागा द्या या महामार्गामुळे सर्वांचाच फायदा होणार आहे या महामार्गाचं महत्त्व पटवून देऊन जनजागृती करण्याचं काम केलं शिवाय शासकीय भावापेक्षा पाच पटीने अधिक मोबदला महामार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मिळून दिला..
![]()
सध्या हा महामार्ग अस्तित्वात आला असून 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा समृद्धी महामार्ग लोकार्पित होत आहे . यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सर्वश्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मेहकर येथील फर्दापुर टोल प्लाझा येथे 11 डिसेबर रोजी दूरदृश्य प्रणाली द्वारे दाखवल्या जाणार आहेत या लोकार्पण सोहळ्यात कार्यक्रमात जिल्ह्यातील शिवसेना भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी सहभागी होणार आहेत तरी जिल्ह्यातील नागरिकांनीही मेहकर फर्दापुर येथे होणाऱ्या कार्यक्रमात शिवसेना भाजपाच्या सदस्यांनी उपस्थित रहावे अस आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे…