बुलडाणा : रविकांत तुपकरांनी बुलढाणा जिल्ह्यात दाखल होताच सर्वप्रथम घेतली सोमठाणा गावकऱ्यांची भेट घेतली …आंदोलनाला बळ दिल्याबद्दल  गावकऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केली..अन्नत्याग आंदोलनानंतर मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज घेवून काल रविकांत तुपकर प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले, त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सोयाबीन-कापूस आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या सोमठाणा गावकऱ्यांची भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली,मुंबई बैठकीत झालेली सविस्तर माहिती त्यांनी गावकऱ्यांना दिली. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण सरकारला १५ दिवसाचा अवधी दिला आहे. जर सरकारने १५ डिसेंबर पर्यंत दिलेला शब्द पाळला नाही, तर त्यानंतर सोयाबीन-कापूस आंदोलनाचा स्फोट होईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here