बुलडाणा : 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन साजरा केला जातो त्यानिमित्त जागृती सप्ताहाच आयोजन जिल्ह्यात करण्यात आल होत या सप्ताहाच्या समारोपिय कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली . सर्वसामान्य लोकांमध्ये या रोगाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथे एडस जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ...या जनजागृती रॅलीला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुरु झाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी या रॅलीला हिरवी झेंडा दाखवला शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप पुन्हा जिल्हा सामान्य झाला यावेळी एड्स रोगासंबंधी माहिती देणारे पथनाट्य सादर करण्यात आलं तर एड्स संदर्भातील माहिती आणि झपाट्याने या रोगाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपायोजना संदर्भाची माहिती यावेळी डॉक्टरकडून देण्यात आली या कार्यक्रमाला नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते….
Home आपला जिल्हा एड्स जनजागृती सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त बुलढाण्यात करण्यात आली जनजागृती रॅली संपन्न..