सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची.09 डिसेंबरला होणार बैठक..

0
69
  1. बुलडाणा :सोयाबीन-कापूस प्रश्नी, नुकसान भरपाई, पीकविमा, दुष्काळ यासह अन्य मुद्दांवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आंदोलनाची भूमिका घेतली. एल्गार रथयात्रा, त्यानंतर एल्गार मोर्चा ,अन्नत्याग आंदोलनंतर तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथी गृहावर सरकारने विस्तृत चर्चा केली. या बैठकीत सरकारने बहुतांशी मागण्या मान्य करत देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा शब्द तुपकर व शेतकऱ्यांना दिला होता. विशेष म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीसांनी तुपकरांना या केंद्र सरकार सोबतच्या बैठकीचे निमंत्रण दिले असल्याची तुपकर याच्या पी ए ने दिली आहे. शनिवारी दि.09 डिसेंबर रोजी रात्री 8.00 वा. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोयाबीन-कापूस प्रश्नी वाणिज्यमंत्री मंत्री पियुष गोयल यांचेसोबत ना.फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यावेळी सोयाबीन-कापसाला खाजगी बाजारात दरवाढ मिळण्यासाठी आयत-निर्यात धोरणात काय बदल केले पाहिजे, या अनुषंगाने रविकांत तुपकर शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत…या बैठकीत काय होते त्यानंतर रविकांत तुपकर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करणार आहे …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here