Home आपला जिल्हा अधिकाऱ्याला लाच देणे महागात पडले..अडीच लाख रुपायांची लाच देणाऱ्या व्यापाऱ्यांलाच ए सी...
- बुलडाणा = कोणत्याही कार्यालयात लाच दिल्या शिवाय काम होत नाही …अशी सर्वसामान्यांची नेहमीच ओरड असते. पण बुलढाणा जिल्ह्यात यांच्या विपरीत घडलयं… अडीच लाख रुपयाची लाच देणाऱ्या एका व्यापारालाच जीएसटी अधिकाऱ्यांनी लासलुचपत अधिकाऱ्यांना पकडून दिल्याने खळबळ उडाली आहे . बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील व्यापारी प्रवीण अग्रवाल यांची बजरंग इंडस्ट्रीज नावाने दाल मिल आहे. सन 2017 2018 या वित्तीय वर्षाचा दोन कोटी 77 लाख रुपयांचा टॅक्स प्रवीण अग्रवाल यांनी थकवला होता. याबाबत खामगाव जीएसटी कार्यालयाकडून अग्रवाल यांना तीन वेळा नोटीस बजावण्यात आली होती थकबाकीची रक्कम व्याजासह 2 कोटी 94 लाख रुपये झाली होती डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी कार्यालयाकडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच प्रकरण नील करण्यासाठी अग्रवाल यांनी जीएसटी आयुक्तांना तीन लाख रुपयाची ऑफर दिली होती लाच घेण्याची मानसिकता नसल्यामुळे जीएसटी आयुक्तांनी थेट जालना येथील अँटी करप्शन ब्युरोला संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर खामगाव कार्यालयामध्ये सापळा रचण्यात आला. 20 डिसेबर च्या संध्याकाळी 2.5 लाख रुपये व्यापारी प्रवीण अग्रवाल यांनी आयुक्तांच्या टेबलवर ठेवली .त्यानंतर आयुक्तांनी ए सी बीच्या पथकाला इशारा केला त्यांनतर लाच देणारा आरोपी प्रवीण अग्रवाल यांना जालना येथील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने ताब्यात घेतले आणि आरोपी प्रवीण अग्रवाल विरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.