बुलढाणा (प्रतिनिधी)
मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेऊन या महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीची पाहणी आज खासदार प्रतापराव जाधव यांनी करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या संदर्भात सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत
बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा मेहकर या दोन तालुक्यामधून प्रामुख्याने नागपूर मुंबई हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे या
महामार्गावरील कामाची पाहणी आज आठ नोव्हेंबर रोजी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी या महामार्गामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे धुळीमुळे नुकसान झाले अशी तक्रार केली खासदार प्रतापराव जाधव यांनी या तक्रारीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना व संबंधित कंत्राटदारांना शेतकऱ्यांच्या समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी व त्यांच्या शेतातील पिके वाचविण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यात काम करावे असे निर्देश दिले शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी सुद्धा यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच तहसीलदार व शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते