केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेने चर्चासत्र घेऊन शेतकऱ्यांमध्ये केली जनजागृती*

0
255

: *केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेने चर्चासत्र घेऊन शेतकऱ्यांमध्ये केली जनजागृती*

चिखली प्रतिनिधी

केंद्र सरकारने पारित केलेले कृषि विधेयक हे शेतकरी हिताचे असून या विधेयकातील माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातुन शेतकरी संघटनेच्यावतीने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे चर्चासत्र आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत

शेतकरी नेते शरद जोशी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक 12 डिसेंबर रोजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी जनजागृती चर्चासत्र घेण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांना अभिवादन करून चर्चसत्राला सुरुवात करण्यात आली या चर्चासत्रातमध्ये नवीन कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या कशी फायद्याची आहेत यासंदर्भात शेतकरी नेत्यांनी मार्गदर्शन केले

केंद्र सरकारने पारित केलेली तिन्ही कायदे रद्द झाल्यास देशातील शेतकऱ्याच्या जीवनात व राजकारणावर अनिष्ट प्रभाव पडेल शेतकरी व्यापारी स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल आणि पुढील पन्नास वर्षे तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचे धाडस करणार नाही हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे हे मागे घेऊ नये या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली नवीन कृषी विषयक धोरण रद्द करू नये अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसिलदारामार्फत देण्यात आले या चर्चासत्रामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेवराव जाधव एकनाथ पाटील समाधान पाटील विनायक वाघ शेतकरी संघटनेचे सदस्य शेतकरी बांधव आणि महिला शेतकरी या वेळी उपस्थित होत्या

byte देविदास कणखर जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना
byte दामोदर शर्मा राज्य कार्यकारी सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here