बुलडाणा कोरोना अलर्ट : प्राप्त 276 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 27 पॉझिटिव्ह* *19 रूग्णांना मिळाली सुट्टी*
बुलडाणा दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 303 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 276अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 27 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 24 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 253 तर रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 276 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 1, दे. राजा शहर : 4, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : कोलवड 1, खामगांव शहर : 4, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : जळका 1, दुसरबीड 1, धार कल्याण 2, सिनगांव जहागीर 1, जळगांव जामोद तालुका : आडोळ 1, सुनगांव 1, जळगांव जामोद शहर : 1, चिखली तालुका : पाटोदा 1, शेलूद 1, भोगावती 1, चिखली शहर : 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 27 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे पाटोदा, ता. चिखली येथील 70 वर्षीय पुरूष रूग्णाचा स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे उपचादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 1, आयुर्वेद महाविद्यालय 1, स्त्री रूग्णालय 2, नांदुरा : 2, सिं. राजा : 2, खामगांव 2, शेगांव : 2, मलकापूर : 1, लोणार : 1, चिखली : 5.
तसेच आजपर्यंत 81584 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11379 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11379 आहे.
तसेच 1457 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 81584 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11853 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11379 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 330 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 144 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.