*12 जानेवारीला सिंदखेडराजा येथे भव्य स्वरूपात होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द* *मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार सोहळा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून होणार प्रक्षेपण*
बुलडाणा ( प्रतिनिधी)
12 जानेवारीला मराठा सेवा संघाच्यावतीने भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असुन हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे यांनी दिले आहे
राष्ट्रमाता जिजाऊंच जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाडा मध्ये दरवर्षी 12 जानेवारीला जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखल होत असतात तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टी वर शिवधर्म व्यासपीठावर वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं याठिकाणी विविध प्रकारचे बुक स्टॉल व जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात सोबतच मराठा सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा मराठा विश्र्व भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते परंतु या वर्षी कोरोना महामारीची पार्श्वभूमी असल्यामुळे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याचा संकल्प बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा भव्य स्वरूपात साजरा न करता अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे या वर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा भव्य स्वरूपातील रद्द करण्यात आला आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली