*बुलडाणा जिल्हयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ कमलताई जालिंधर बुधवत यांच्या हस्ते पाडळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला
यावेळी बाजार समितीचे संचालक श्रीकांत पवार, माजी सरपंच रवींद्र पवार, शाखा प्रमुख कमलेश पवार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ रवींद्र गोफणे, डॉ विश्वभंर देवकर, डॉ अक्षय तुपकर, दीपक महाले, एम के चंद्रशेखर, डी डी जाधव, प्रदीप चौधरी, गणेश सुरडकर यांची उपस्थिती होती.
बुलढाणा जिल्ह्यात सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नाही याची काळजी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार आहे. यासाठी मोबाईल पथक, ट्रान्सीट टिम आदी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लक्ष 95 हजार 387 बालके असून शहरी भागात 59 हजार 120 बालके आहेत. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 54 हजार 507 लाभार्थी बालकांचे लसीकरण अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणासाठी 2139 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबतच विविध विभागातून एकूण 5343 कर्मचाऱ्यांचे सहकार्य करीत आहे . त्यासाठी 412 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 130 मोबाईल टिम, 148 ट्रान्झीट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत.