नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरु केले धरणाच्या भितीवर उपोषण ..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपोषणाला पाठिंबा…

0
170

नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरु केले धरणाच्या भितीवर उपोषण ..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपोषणाला पाठिंबा…

निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस असून काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथाळे यांनी या उपोषणाना पाठिंबा दिला आहे मागण्या मान्य न केल्यास कालव्याचे पाणी बंद करू असा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे…
खामगाव तालुक्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवारातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या अधिग्रहीत करण्यात आली आहे परंतु नुकसानभरपाईची त्यांना मिळाली नाही यासंदर्भात संबंधित विभागाकडे दाद मागितली असता अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप करत असल्यचा या शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाधित क्षेत्रातील पिड़ीत शेतकऱ्यांनी थेट धरणाच्या काठावर 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे. या बुलडाण्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवरातील या शेतक-याच्या उपोषणाला काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देताच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज कालव्याचे पाणी बंद करू असा इशारा दिला होता. मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे आंदोलनास स्थगित करण्यात आले आहे. यावेळी संपादित केलेल्या जमिनीच्या फळझाडांचा मोबदला मिळावा, डुबित शेत जमिनीचा मोबदला मिळावा तसेच प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष श्याम अवथाळे यांनी दिला आहे.. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण धरणाच्या काठावर सुरू आहे त्याठिकाणी ज्ञानगंगा अभयारण्यातील हिंग्र पाण्याचा धोकाही या उपोषणकर्त्यां शेतकऱ्यांना आहे अद्याप पर्यंत सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली नाही या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here