धाड बस स्थानकाच्या विकासासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करण्यात आली पाच कोटी रुपये निधीची मागणी*

0
137
  1. *धाड बस स्थानकाच्या विकासासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करण्यात आली पाच कोटी रुपये निधीची मागणी*

बुलढाणा प्रतिनिधी
बुलडाणा तालुक्यातील धाड येथील बस स्थानकाच्या कामासाठी ५ कोटी निधी द्या. अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत यांनी दिली आहे
बुलडाणा तालुक्यातील धाड हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असून अनेक मोठ्या शहरात जाण्यासाठी धाड येथून बस जातात त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्या दृष्टीने सर्व सोयीयुक्त अद्यावत बस स्थानकाच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख जालींदर बुधवत यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी त्यांच्यासोबत सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे माजी आ डॉ शशिकांत खेडेकर यावेळी उपस्थित होते यावर मा परिवहन मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here