जगविख्यात लोणार सरोवराची मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री करणार पाहणी ….
लोणार = संदीप मापारी पाटील
जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे 5 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे येत असल्याची प्राथमिक माहीती असुन प्रशासन कामाला लागले आहे दौऱ्यादरम्यान ते लोणार सरोवर ची पाहणी करणार आहेत लोणार सरोवराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकास निधीची घोषणा करण्याची शक्यताही आहे…..
लोणार पर्यटनदुष्ट्या महत्वपूर्ण ठरलेल्या मात्र विकासात तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या लोणार सरोवराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा 5 फेब्रुवारी रोजी लोणार येथे येणार असल्याची प्राथमिक माहीती आहे या दौऱ्यानिमित्त लोणार विकासासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे
लोणार सरोवर हे जगप्रसिध्द असुन या सरोवराचा विकास अदयाप झालेला नाही यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा अचानक लोणार सरोवर दौरा जाहीर झाल्याने प्रत्येकाच्या भुंवया उंचवल्या आहे लोणार सरोवराचा सर्वागीन विकास होउन या ठिकाणी देशी व विदेशी पर्यटकाची मंदीयाळी वाढवी या दृ्ष्टीने हा दौरा अपेक्षीत असुन 5 फेब्रुवारी 2021 रोजी मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री लोणार सरोवरास भेट देउन लोणार सरोवराचा विकास आढावा बैठक घेणार असल्याचे संमजते यांबाबत अधिकृत दौरा आला नाही पण महसुल विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग , वन्यजिव अभारण्य विभगाकडुन , पोलीस यंत्रणा याच्याकडुन मुख्यमंत्री यांच्या दौरानिमित्त हेलीपॅड साठी पाहणी केली असुन हेलीपॅड तयार करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांच्या लोणार दौऱ्या हा अचानक जाहीर झाल्याने सर्व विभागाची धावपळ सुरू झाली आहे यामध्ये लोणारवाशीयाना सुखद धक्का बसला असुन मुख्यंमत्री व पर्यटन मंत्री लोणार सरोवरा संदर्भात मोठा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे ……